बिनागुंडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रसाठा उद्ध्वस्त; पोलिसांची मोठी कारवाई -माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले साहित्य पोलीसांकडून नष्ट

90

T NEWS मराठी नेटवर्क –
गडचिरोली(प्रतिनिधी )
आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या बिनागुंडा हद्दीत विविध माओवादी साहित्य नष्ट करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे़
माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जमीनीमध्ये पूरुन ठेवत होते. त्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडून विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इत्यादी प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपातासाठी केला जात होता. गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता संपूष्टात आला असून, माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सविस्तर वृत्त असे आहे की, १६ मे रोजी ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी केली असता, माओवाद्यांनी पोमकें बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून २१ मे रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता यांच्या संयुक्त ६ तुकड्या व बिडीडीएसचे २ पथकाने शोध अभियान राबविले असता दिनाक २२ मे रोजी पोमकें बिनागुंडाच्या जंगल परिसरात एक लेथ मशीन, बिजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडींग/ड्रिलींग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, फुटबॉल पाईप (२० फुट) इ. माओवादी साहित्य आढळून आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले सर्व माओवादी साहित्य पथकातील जवानांच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली, प्राणहिता व बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.

बिनांगुडा जंगलात २ दिवस राबविले शोध अभियान –
आत्मसर्मपित माओवाद‌यांनी दिलेल्या गुप्त माहितीनूसार विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता यांच्या संयुक्त ६ तुकड्या व बिडीडीएसचे २ पथकाने शोध अभियान राबवून जंगलात जमिनीत पुरवून ठेवलेला शस्ञसाठा शोधून काढत त्याला वरिष्ठांच्या आदेशानूसार तिथेच नष्ट करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here