माओवाद्यांचा केंद्रीय समितीच्या वरिष्ठ नेता भुपातीसह 60 जहाल नक्षलवाद्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्समर्पण -नक्षल चळवळीला सर्वोच्च धक्का -गडचिरोली पोलिसांद्वारे अधिकृत पुष्टी नाही

132
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

T NEWS मराठी नेटवर्क-
गडचिरोली(विशेष प्रतिनिधी)
माओवादी चळवळीत दीर्घकाळापासून सक्रिय असलेल्या चळवळीतील प्लॉटून ब्युरो आणि केंद्रीय समितीच्या वरिष्ठ स्तरावर पोहचलेल्या नक्षली नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या ६० सहका-यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे़ भूपती याचेवर विविध राज्यात मिळून तब्बल १० कोटींचे बक्षीस होते़ गडचिरोली पोलिसांनी अद्याप आत्मसमर्पणाची अधिकृत पुष्टी केली नसली तरी गुरुवारी, (दि.१६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भूपतीसह त्याचे इतर सहकारी शस्त्र खाली ठेवणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे़
माओवादी चळवळीत भूपती हा प्रभावशाली रणनीतिकार मानला जातो़ तो अनेक वर्षे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता़ मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आणि संघटनेच्या शीर्ष नेतृत्वात मतभेद वाढले होते़ भूपतीने काही दिवंसापूर्वी ‘सशस्त्र संघर्ष’ निष्फळ ठरत असल्याचे मान्य करीत शासनापुढे शस्त्रसंधी करणार असल्याचे सुतोवाच अनेकदा पत्रकातून केले होते़ मात्र त्याच्या या भूमिकेला काही नक्षल नेत्यांनी विरोध केला़ नक्षली संघटनेचा महासचिव देवजी याने हा लढा सुरु ठेवण्याची भूमिका घेतली होती़ यादरम्यान केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणून शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले़ यानंतर भूपतीने संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करीत अखेर आपल्या ६० सहका-यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्पसमर्पण केल्याची माहिती आहे़ नक्षली चळवळीतील सर्वोच्च नेत्यासह तब्बल ६० नक्षल सदस्यांनी केलेले हे आत्समर्पण नक्षली चळवळीला सर्वोच्च धक्का देणारे आहे़
या आत्मसमर्पणाची अधिकृत पुष्टी जिल्हा पोलिसांद्वारे करण्यात आली नसली तरी गडचिरोली पोलिस दलाच्या सुत्रांनी या हालचालींची माहिती दिली आहे़ भूपती व त्याचे सहकारी सध्या पोलिसांच्या संरक्षणाखाली असल्याचे कळते़ यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही़.
वर्षभरात पत्नी तारक्कासह तिघांचे आत्समर्पण –
भूपती हा माजी महासचिव बसवराज याच्या मृत्यूनंतर तो पक्षाच्या सर्वोच्च पदाचा संभाव्य दावेदार मानला जात होता़ त्याचा धाकटा भाऊ किशनजी उर्फ मल्लोजुला कोटेश्वर राव २०११ मध्ये कोलकता येथील चकमकीत ठार झाला होता़ तर दंडकारण्य विभागाची सदस्य महिला नक्षल नेता असलेली भूपतीची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिने गेल्या वर्षीच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते़ त्यानंतर मागील महिन्यातच केंद्रीय समिती सदस्य तथा सर्वोच्च महिला नक्षली नेता असलेली त्याची वहिनी पोथूला पद्मावती उर्फ सुजाता हिनेही शरणागती पत्करली होती़ वर्षभरात एकाच कुटूंबातील तिघांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळतील एका रक्तरंजित अध्यायाचा शेवट झाला आहे़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here