कमलापूर हत्ती कॅम्प येथे पर्यटकांसाठी पाणपोई सुरू; तनुश्री ताई आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

121

T NEWS मराठी नेटवर्क –
कमलापूर (प्रतिनिधी )अहेरी तालुक्यातील मौजा कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी पाणपोई उभारण्यात आली असून, तिचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
स्व. रामचंद्र तारिकोंडावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमाचे सौजन्य सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचे होते. “स्वच्छ पाणी… आरोग्यदायी जीवन…” तसेच “पाणी वाचवा… जीवन वाचवा…” असा सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला.
या पाणपोईचे उद्घाटन मा. तनुश्रीताई आत्राम (सिनेट सदस्य, गडचिरोली) यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी हत्तीला खाद्यपदार्थ देत आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाला संतोषजी ताटीकोंडावार, मंतय्याजी आत्राम, सांबय्याजी करपेत, संतोष बोम्मावार, सुदीप रंगुवार, स्नेहादीप आत्राम, महेश येन्नमवार, गौरेश गडमडे (वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापूर), पेंदोर सर (आर.ओ., कमलापूर वनपरिक्षेत्र), कैलास कोडापे, रजनिता लक्ष्मण मडावी (प्रशासक, ग्रामपंचायत कमलापूर), माया अशोक आईला, पूजा अनिल येडला आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे हत्ती कॅम्प येथे येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here