भरधाव इनोव्हा कारचा कहर; दुचाकीस्वार तरुण ठार, एक गंभीर -एटापल्लीतील आलदंडी येथील घटना; एक गंभीर

529

T NEWS मराठी नेटवर्क –
एटापल्ली (प्रतिनिधी) तालुक्यात पुन्हा एकदा भरधाव वाहनाच्या धडकेत निष्पाप तरुणाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एटापल्लीपासून ७ किमी अंतरावरील आलदंडी गावाजवळ गुरुवारी भरधाव कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. अनिल हिचामी असे मृतकाचे नाव असून बालाजी दुर्वा असे गंभीर जखमीचे (दोघेही रा़ परसलगोंदी ता़ एटापल्ली) नाव आहे़
प्राप्त माहितीनुसार एमएच ३४ सीडी ०८०० क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा गाडी भरधाव वेगाने जात होती़ तर अनिल हिचामी व बालाजी दुर्वा हे दोघेही एटापल्लीवरुन गावाकडे जात होते़ दरम्यान आलदंडी गावाजवळ भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात अनिल हिचामी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ तर बालाजी दुर्वा याला गंभीर दुखापत झाली़ जखमीला तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले़ गंभीर जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे़
घटनेची माहिती प्रापत होलाच आलदंडी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला़ मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले़ पुढील तपास आलदंडी पोलिस करीत आहेत़ वाढत्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here