



-जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,अहेरी विधानसभा काँग्रेस समन्वयक,अजयभाऊ कंकडालवार व माजी आमदार पेंटारामाजी तलांडी यांचा प्रमुख उपस्थित

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी ) गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी दोन दिवशीय सिरोंचा तालुका दौऱ्यावर आले होते.त्यावेळी काँग्रेस कमिटी सिरोंचा तर्फे खासदार डॉ.नामदेवराव किरसान आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे व माजी जिप.अध्यक्ष तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार, माजी आमदार पेंटारामाजी तलांडी,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची ढोल तशाने फाटक्याचा अतिष बाजी करत सिरोंचा शहरात जंगी स्वागत केली.
खासदार डॉ.नामदेवराव किरसान तालुक्यातील विकास कामाचा आढावा बैठक घेऊन सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिल्यावर सिरोंचा काँग्रेस कमिटी कडून डॉ.नामदेवराव किरसान यांचा सत्कार करण्यात आला. सिरोंचा शहरातील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनही खासदार किरसान यांच्या हस्ते पार पडले.
खासदार डॉ.नामदेवराव किरसान,जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी जिप.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी इंदिरानगर,आदीमुत्तापूर,बामणी,झिंगानूर,रेगुंठा,मोयबीनपेठा,पारसेवडासह आदी भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या जाणून घेतली.संसदेत या समस्यांची आवाज उठवून लवकरात लवकर समस्यांची निराकरण करण्यात येईल अशी नागरिकांना आश्वासन दिले.
आज पर्यंत अनेक खासदार निवडून आले.पण आपला सारखं खासदार नागरिकांचा प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या जाणून घेतले नाही.आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुक वेळी काँग्रेस पक्षाने खंबीर पणे उभे राहून काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला जिंकून देण्यासाठी भक्कम पणे काम करणार अशी दौऱ्यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार किरसान यांना नागरिककांनी सांगितले आहे.
यावेळी महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























