


T NEWS मराठी नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )नगरपंचायत स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी, (दि.२१) नगरपंचायत सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकहाती सत्ता प्रस्थापित करीत आपला दबदबा कायम राखला.
माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि नगरपंचायतचे यशस्वी उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या प्रभावी रणनीतीमुळे पक्षाने दणदणीत विजय संपादन केला. या निवडणूकीत स्वच्छता समिती उपाध्यक्ष पदी बबलू पाशा यांची निवड करण्यात आली़ बांधकाम सभापती पदी बक्कु पोचम आकुदारी, पाणीपुरवठा सभापती पद्मा भगवान पिल्ली, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मलेश्वरी संजीव पेदापल्ली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या विजयामागे नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांची रणनीती निर्णायक ठरली आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षा फर्जाना शेख यांनी सत्ताधारी सदस्यांमध्ये एकजूट राखत युतीच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.



























