बानय्या जनगाम यांच्या नेतृत्वात आ. धर्मरावबाबा आत्राम यांना साकडे -सामाजिक विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करा

110
oplus_161480706

T NEWS मराठी नेटवर्क
सिरोंचा (प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिल्या जाते.
या योजनेअंतर्गत सिरोंचा तालुक्यात विविध विकास कामे मंजूर करुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी राकाँचे (अजित पवार गट) कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या नेतृत्वात पदाधिका-यांनी आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचेकडे निवेदनातून केली आहे़.

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी सिरोंचा तालुक्यात सिरोंचा येथील परिवर्तन भवन परिसरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकामास मंजूरी प्रदान करीत १ कोटी रुपयांचा तर आसरअल्ली मार्गावरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचे सौंदर्णीकरण करणे, पथदिवे, स्ट्रिट लाईट लावण्यासह हातपंप, कुंपण (तार) बांधकामास मंजूरी प्रदान करुन ५० लाखाचा निधी उपलब्ध करुन द्यावा़ या विकास कामास निधी मंजूर करुन देण्यासाठी आमदार महोदयांनी शासन स्तरावरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली़

निवेदन सादर करतांना राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, नगरसेवक नरेश अलोन, अमृतराव वाळके, सरपंच शंकर रत्नम, उपसरपंच बापू आतकुरी, दुर्गेश लंबाडी, रामचंद्रू गोगुला, रामचंद्र दुर्गम, वृषभ अलोने, बालाजी बोरे,राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here