


T NEWS मराठी नेटवर्क–
सिरोंचा (प्रतिनिधी)
तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रात आमचे गाव मोडीत असून मागील अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे़ गावात सोयीसुविधांचा अभाव असल्याने अनेक गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे़ विशेषत: पावसाळ्यात गाव चारही बाजूने पाण्याने वेढत असल्याने जगाशी संपर्क तुटतो़ त्यामुळे आमचे सुरक्षित जागे स्थलांतर करुन देत मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, असे साकडे चिपूरदूब्बा येथील ग्रामस्थांनी आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तहसीलदार यांचेमार्फत जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून घातले आहे़.
निवेदनात चिपूरदुब्बा ग्रामवासीयांनी म्हटले आहे की, गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत़ गावात मुलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ गावात पिण्याच्या पाण्याची कोणतीच शाश्वत सोय नाही़ अंतर्गत तसेच बाहेरी रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय असून पावसाळ्यात गावातून तालुका मुख्यालयी ये-जा करणे पूर्णत: अशक्य होते़ विद्यूत समस्याही कायम असून वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्याऱ्थ्यांचे शिक्षण, आजारी व्यक्तींचे उपचार तसेच दैनंदिन जीवन पूर्णत: विस्कळीत होत आले आहे़ विशेषत: पावसाळ्याच्या कालावधीत चारही बाजूने पाण्याचा वेढा बसत असल्याने गावाचा तालुका मुख्यालयाशीच नव्हे तर जगाशी संपर्क तुटतो़ आपतकालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेणेही अशक्य होऊन बसते़ या पुरस्थितीमुळे गावातील नागरिकांच्या जीवितास कायम धोका असतो़
सदर बाब गांभीर्याने घेत चिपूरदूब्बा गावातील नागरिकांचे सुरक्षित व सोयीसुविधायुक्त अशा ठिकाणी तातडीने स्थलांतर करण्यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी ग्रामवासीयांनी तहसिलदार यांचेमार्फतीने जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे़.निवेदनाची प्रत आ़ धर्मरावबाबा आत्राम, सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक, सिरोंचा वनपरिक्षेत्राधिकारी यांनाही सादर करण्यात आले आहे़.
निवेदन सादर करताना राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम,राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,ग्रामपंचायत मेडाराम उपसरपंच सत्यम ठाकूर, माजी उपसरपंच वेंकटेश तल्ला, सरपंच अजय आत्राम,, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला,मुलक्का भिमय्या गट्टा, कडार्ली पुलय्या, रामतेनी मलन्ना, दासरी पोचम, सुलता भूरसे आदींसह चिपूरदुब्बा ग्रामवासीय बहूसंख्येने उपस्थित होते.



























