समाजभवनासाठी नाभीक समाजाचे नप उपाध्यक्षांना साकडे -बबलू पाशा यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

236

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) समाज भवन बांधण्याची मागणी करत नाभिक समाज संघटनेने नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्याकडे निवेदन सादर केले.

बबलू पाशा यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी लवकरच समाज भवनाचे बांधकाम करून देण्याची ग्वाही दिली. यामुळे नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे.ही मागणी नाभिक समाजाची प्रलंबित मागणी होती. समाज भवन बांधल्याने नाभिक समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना एक छत्रछाया मिळेल.नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी नाभिक समाजाच्या या मागणीला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नाभिक समाजातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त होत आहे.

निवेदन सादर करताना नगरसेवक इम्तियाज खान,नगरसेवक राजेश बंदेला,नागेश दूग्यला,सिरोंचा नाभिक समाज अध्यक्ष
येरय्या दागम, उपाध्यक्ष राजमल्लू दागम,सतीश दागम,सदाशिव दागम, संदीप दागम,राहुल बत्तुला,नागेश पोतुला,पुल्लय्या दागम,राकेश समुद्रलवर व नाभिक समाजाचे नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here