माजी जिप.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून किष्ठापूर येथील युवकांना क्रीडा साहित्य वाटप

680

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी(प्रतिनिधी)तालुक्यातील वेलगूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या किष्ठापूर येथील युवकांना क्रीडा साहित्याची गरज होती.पण आर्थिक अडचणीमुळे हे साहित्य युवकांनी घेऊ शकत नव्हते.आज येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची अडचण बाबत सांगितले होते.

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक कंकडालवार यांनी त्या युवकांची अडचण लक्षात घेऊन युवकांना क्रीडा साहित्य खरेदी करून दिले.त्यामध्ये व्हॉलीबॉल,नेट आणि इतर काही वस्तू आहे.या साहित्यामुळे किष्ठापूर येथील क्रीडा युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यावेळी गावातील समस्त क्रीडा युवकांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,विनोद रामटेकेसह किष्ठापूर येथील युवक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here