गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी आदेश

104

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यात 7 जून 2025 रोजी बकरी ईद सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात 26 मे ते 9 जून या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागु करण्यात आलेले आहे.
सदर आदेश संपुर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागु राहतील, असे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेशीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here