लांबडपल्ली येथील युवकाची गळा दाबून निर्घूण हत्या(murder) -सिरोंचा तालुक्यातील लांबडपल्ली येथील घटना

1093

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा तालुक्यातील लांबडपल्ली येथे एका युवकांची गळा दाबून निर्घूण हत्या (murder )केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी, (दि.3) रात्री 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. राजकुमार दुर्गय्या दुर्गम (26) रा. लांबडपल्ली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार राजकुमार दुर्गम हा गावातीलच एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास तो घरी परतला. दरम्यान अज्ञात इसमाने त्याचा गळा दाबून खून केला. मध्यरात्रीच्या सुमारास राजुकमार निपचित पडलेला कुटूंबियांना आढळून आला. घटनेची माहिती प्राप्त होताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे करीत आहेत. या हत्तेमुळे लांबडपल्ली गावात एक दहशत निर्माण झाली आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट-
रात्रीच्या सुमारास राजकुमारची अज्ञात व्यक्तीद्वारे गळा दाबून हत्या करण्यात आली. मात्र हत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट होत. त्याची हत्या कोटूंबीक वादातून की अन्य कारणामुळे, याचा तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी सिरोंचा पोलिसांद्वारे संशयितांची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यांचा आढावा घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here