(Aeroplane Crash)गुजरातमध्ये मोठा विमान अपघात! विमान दुर्घटनेत मोठ्याप्रमाणात जीवितहानी

577

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानीनगर या रहिवाशी भागात कोसळलं आहे. या घटनेत 204 लोकांचे प्राण गेले आहेत. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी 41 जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.

हे विमान एअर इंडियाचे Flight AI171 होते. उड्डाणानंतर लगेचच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 242 प्रवाशांसह हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते. या अपघातस्थळी अग्निशमन दलाची वाहनं, पोलीस तसेच मदतकार्य करणारी पथकं कार्यरत झाली असून गुजरात सरकार आणि केंद्र सरकार मदतकार्य करत आहेत.

हे विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं आहे. बीबीसीशी बोलताना रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं, “घटनेनंतर सर्वत्र काळाधूर पसरला, रुग्णवाहिका तिकडे धावल्या. लोकांच्या देहाचे तुकडे पडले होते. मुलांच्या वसतिगृहालाही धक्का बसला असेल. या घटनेमुळे 2001 साली झालेल्या भूकंपाची आठवण झाली.”

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताबद्दल म्हणाल्या, “अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेमुळे मला अत्यंत दुःख झालं आहे. ही हृदयद्रावक दुर्घटना आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना पीडित लोकांसोबत आहेत. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.”

या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. “अहमदाबादमधील दुर्घटनेनं आम्हा सर्वांना स्तब्ध आणि दुःखी केलं आहे. हे शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या दुःखद क्षणी माझ्या सहवेदना पीडितांसोबत आहेत. मदतकार्यात गुंतलेल्या संबंधित मंत्र्यांशी आणि प्रशासनाशी मी संपर्कात आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

(साभार- BBC news मराठी )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here