एक उत्कृष्ट सुरक्षा रक्षक हरविले -डोनाजी पेद्दी यांना भावपूर्ण श्रद्धांजली -आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे शोकसंवेदन

652

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी)
एसपीयू डोनाजी पेद्दी हे अनेक वर्षे बॉडीगार्ड म्हणून सेवा दिले, रक्तदाबामुळे (बीपी)मागील आठ नऊ महिन्यापासून आजारी होते, आज सकाळी दहा साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली, ही दुःखद घटना मला समजताच अत्यंत वाईट वाटले असून एक उत्कृष्ट सुरक्षारक्षक हरविले. पेद्दी परिवारावर हा एक आघात असून पेद्दी परिवाराच्या दुःखात मी सामील असून मेजर डोनाजी पेद्दी यांना भावपूर्ण श्रद्धांजली असल्याचे शोकसंदेश व शोकसंवेदना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.
शोक संवेदनात पुढे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, डोनाजी पेद्दी हे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली येथील रहिवासी होते याच भागातील असल्याने एक वेगळाच जिव्हाळा होता.
त्यांच्या निधनाने पेद्दी परिवारावर, सहकारी व मित्रपरिवारावर आघात व दुःख झाले असून यातून लवकरच सावरण्यासाठी शक्ती व बळ प्राप्त होवो हीच प्रार्थना आणि मेजर डोनाजी पेद्दी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here