विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी नपं पदाधिकारी उतरले रस्त्यावर -महामार्गांवर केले टीय्या आंदोलन -काही वेळ वाहतूक ठप्पा

316

 गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-

सिरोंचा(विशेष प्रतिनिधी )- तालुक्यातील नागरिक एकीकडे पावसाळ्याचे दिवस असून महामार्गमुळे त्रासले असून दुसरीकडे वारंवार होणाऱ्या विद्युत खंडित होत असल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना चांगलंच फटका बसत असून रस्ते व वारंवार खंडित होणाऱ्या वीजमुळे नागरिक चांगलेच त्रासले आहेत.

सिरोंचा आलापल्ली महामार्गमुळे पहिलेच तालुक्यातील नागरिक नाहक त्रास सहन करत ये -जा करत असून दुसरीकडे दिवसात 10 ते 20 वेळा विद्युत खंडित होत असल्याने पावसाळ्याचं दिवसात नागरिकांना जीव धोक्यात घालून काळोख्याचा अंधारात तासां ना तास राहावं लागत आहे. ही बाबा नगर पंचायत सिरोंचा अध्यक्ष शेख फरजाना इफ्तेखर, उपाध्यक्ष बबलू पाशा व काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी यांना कळतच यांच्या नेतृत्वात नपं पदाधिकारी व इतर पक्षाचे राजकीय पुढाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गांवर मध्यरात्री अंदाजे 1 वाजता सुमारास चक्का जाम आंदोलन केल्याने काही काळ मारमार्गांवर वाहतूक ठप्पा झालं होता. यादरम्यान तहसिलदार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक, सिरोंचा पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी मध्यस्थिची भूमिका घेत रात्रीच्या सुमारास महावितरणच्या अधिका-यांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधित समस्या मांडली. यावर संबंधित अधिका-यांनी तत्काळ वीज समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनात न. पं. अध्यक्ष शेख फरजाना इफ्तेखर, उपाध्यक्ष बबलू पाशा, सिरोंचा काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, राहुल गरपेल्ली, सलार सय्यद, नागेश दुग्याला, स्वीकृत नगरसेवक राजू बंदेला, मजीद अल्ली, सतीश येगोलापू, रियझ शेख, शब्बीर शेख, प्रणित मारगोनी आदींसह बहूसंख्य शहरवासीय उपस्थित होते.

सिरोंचा तालुका हा गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचं टोक असून या तालुक्यावर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेहमी नजरअंदाज राहत असून सिरोंचा तालुक्यात वीज, रस्ते, आरोग्य समस्या आवर्जून उभे आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर विषयावर महाराष्ट्र वीज वितरण अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा खंडित होण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची माहिती नपं उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी दिले आहे.

सिरोंचा तालुक्यात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना अंधारात जीवन जगावा लागत आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अंधारात विषारी जीवजंतूपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीज वितरण कंपनी कडून खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर थोडगा काढून वीज पुरवठा सुरळीत ना केल्यास वीज वितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सिरोंचा तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश जावजी यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here