


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम शुक्रवार 25 जुलै रोजी सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले.
सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा,मादाराम, विठ्ठलरावपेठा,मोयाबिनपेठा, बेज्जुरपल्ली,बामणी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षात प्रवेश केले. त्यांचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचे घडी चिन्हाचे दुप्पटे टाकून स्वागत केले.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सिरोंचा तालुक्यातील विविध गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने पक्षाची बाजू अजून भक्कम बनली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोलूरी, नगर सेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार,नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,सत्यनारायण परपटला,सत्यम पिडगू आदी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



























