त्या भीषण अपघातात(Accident) चौघे ठार : दोघे गंभीर

275

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(विशेष प्रतिनिधी)
मार्निंक वॉकला गेलेल्या सहा बालकांना अज्ञात ट्रकचालकाने चिरडल्याने चौघेजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारी, (दि.7) पहाटेच्या सुमारास गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली गावाजवळ उघडकीस आली आहे. टिंकू नामदेव भोयर (14), तन्मय बालाजी मानकर (16), सुशात दुर्योधन मेश्राम (14), तुषार राजेंद्र मारभते (14) सर्व रा. काटली अशी मृतक बालकांची नावे आहेत. क्षितिज तुलसीदास मेश्राम व आदित्य धनंजय कोहपरे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या घटनेने आक्रोशित ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन पुकारल्याने काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राप्त माहितीनुसार नेहमीप्रमाणे काटली गावातील मुले पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गावालगतच्या मुख्य मार्गावरील नाल्याजवळ गेले होते. दरम्यान सकाळी 5.10 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या काठावर बालके बसून असतांना भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात ट्रकने सहाही बालकांना चिरडले. यात टिंकू भोयर व तन्मय मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशात मेश्राम, तुषार मारभते यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेत असलेल्या तुलसीदास मेश्राम व आदित्य कोहपरे यांना नागपूर येथे हेलिकॉप्टरने उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री (cm)फडणवीस यांचेद्वारे शोक व्यक्त
अपघातात बालके ठार झाल्याची माहिती प्राप्त होताच राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवर शोक व्यक्त केले. राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा करीत जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच गंभीर जखमींना उपचारासाठी संबंधित यंत्रणांना तत्काळ मदत व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here