


T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
जिल्हाचा शेवटचा टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील ब्रिटिशकालीन एका जिल्हाधिकारीचा नावाने असलेल्या ग्लासफोर्डपेटा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे़ कंत्राटदाराद्वारे मनमर्जीने बांधकाम केले जात आहे़ या कामाची देखरेखीची जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यानेही याकडे कानाडोळा केला असल्याने नागरिकांमध्ये शंका उपस्थित केल्या जात आहे़
ग्लासफोर्डपेठा गावासह परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर सुयोग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी येथे आरोग्य उपक्रेंद्र तसेच निवासस्थान अशा दुमजला इमारत बांधकामास मंजूरी प्रदान करण्यात आली़ या इमारत बांधकामासाठी शासनाने निधीची तरतूद करुन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली़ परंतु काम करणाऱ्या यंत्रणेचा दोषामुळे इमारतीचा बांधकाम निक्रुष्ट दर्जाचे होत आहे. बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे़ बांधकामात कमालीची निकृष्टता, पर्यवेक्षणाचा अभाव, गुणवत्ता नसतांना स्थानिक अभियंता व व्यवस्थापन प्रणालीचा याकडे कामालीचे दुर्लक्ष केले असल्याने कंत्राटदार मनमर्जीने काम करीत असल्याचा आरोप होता आहे़ मात्र यामुळे इमारतीची आयुष्य कमी होऊन काही वर्षात सदर इमारती कोसळण्याची धोका निर्माण झाला आहे़ या कामात कमी दर्जाची सामग्रीचा वापर, स्वस्त व निकृष्ट दजाचे सिमेट, वाळू व इतर साहित्यांचा वावर होत आहे़ बांधकाम निकृष्ट होत असतांना बांधकाम विभागाचे अभियंता केवळ कार्यालयातून कागदोपत्री कामकाज पाहत असल्याचे दिसून येत आहे़ याचाच गैरफायदा संबंधित कंत्राटदार घेत असून शासनाच्या पैसावर डल्ला मारित असल्याचा आरोप होत आहे़ त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करुन संबंधित कंत्राटदार तसेच बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे
कोणत्याही इमारतीचे बांधकाम करतांना एक घमेला सिमेंट, दीड घमेला रेती, तीन घमेला गिट्टीचा वापर करणे अत्यावश्य आहे़ मात्र संबंधित कंत्राटदाराद्वारे नियमाला तिलांजली देत एक सिमेंट बोरीमागे १२ घमेला निक्रुष्ट दर्जाचे रेती आणि ८ घमेला गिट्टी वापरित आहे़ यामुळे इमारतीचे बांधकाम ढिसाळ होऊन लवकरच या इमारतीची वयोमर्यादा संपणार असल्याचे नागरीकांद्वारे बोलल्या जात आहे़






























