सामाजिक-सांस्कृतिक वारसा जपणारा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

321

T NEWS मराठी नेटवर्क-

अहेरी(प्रतिनिधी) तालुक्यातील वेलगूर येथे दिनांक १६ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी ल मुठवा पहांदीपारी कुपार लिंगो तथा विर बाबुराव सडमेक सल्ला गांगर यांच्या शक्ती स्थापना, साप्तरंगी ध्वजारोहण, सामूहिक विवाह सोहळा आणि सामाजिक-सांस्कृतिक कोया पुनेम संमेलनाचा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला.

या ऐतिहासिक कार्यक्रमास *माजी मंत्री व विद्यमान आमदार मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम* यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी कोया पुनमच्या सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व, सामाजिक एकता व आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज यावर मार्गदर्शनात्मक भाष्य केले.

कार्यक्रमात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शक्ती स्थापना आणि साप्तरंगी ध्वजारोहण यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तर सामूहिक विवाह सोहळ्याने अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय फुलवला.

कोया पुनेम संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, कला-साहित्य, आणि एकत्रित विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, मान्यवर, सामाजिक बांधव आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.

वेलगूरमध्ये सांस्कृतिक ऐक्याचा, परंपरेचा आणि सामाजिक सलोख्याचा अनोखा संगम अनुभवास आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here