


T NEWS मराठी नेटवर्क-
आलापल्ली(प्रतिनिधी) सोमवार, दि. १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आलापल्ली येथे क्रीडा संमेलनाचे भव्य उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन हर्षवर्धनराव धर्मरावबाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय अस्वले, अप्पर जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, अहेरी यांनी भूषविले.विशेष अतिथी म्हणून मान्यवरांची उपस्थिती बालाजी सोमवंशी – तहसिलदार,अहेरी हर्षल एकरे – पोलीस निरीक्षक,गणेश शहाणे – मुख्याधिकारी, नगर पंचायत,
किरण वानखेडे,तालुका आरोग्य अधिकारी
प्रमुख पाहुणे म्हणून शंकर गंगाधर मेश्राम – सरपंच विनोद अकनपल्लीवार – उपसरपंच सुरेश गड्डमवार – अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, आलापल्ली राजु एस. बुर्गे – अध्यक्ष, शा.व्य.स. आलापल्ली (मुले) स्वाती देवाडे – अध्यक्षा, शा.व्य.स. आलापल्ली (मुली) गजानन लोनवले – मुख्याध्यापक, राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली संजय कोडेलवार – मुख्याध्यापक, धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, आलापल्ली
हर्षवर्धन बाबा आत्राम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन-
उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन बाबा आत्राम म्हणाले,
“मुलांनो, मनापासून आणि प्रामाणिकपणे खेळा. क्रीडा हे फक्त जिंकण्याठी नसते—ते शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास देणारे माध्यम आहे. तुम्ही मैदानावर जितके चांगले खेळाल, तितके तुम्ही जीवनात पुढे जाल. तुमच्या मेहनतीमुळे आपल्या तालुक्याचे नाव मोठे होईल, हीच अपेक्षा आहे.”
त्यांच्या प्रेरणादायक शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जोश निर्माण झाला. विविध क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला अधिकारी, नागरिक, शिक्षक, खेळाडू आणि पालक यांची मोठी उपस्थिती लाभली. क्रीडा संमेलनाचे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि ऊर्जावान दिसून आले.






























