


T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) तालुक्यातील रमेशगुडम गावात 30 नोव्हेंबर 2025 रोजी स्नेहाधर्म धर्मार्थ दवाखाना, सिरोंचा यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे मार्गदर्शन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले, तर युवा नेते मा. हर्षवर्धनराव धर्मरावबाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

शिबिरात एकूण 170 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यांपैकी 70 रुग्ण मोतिबिंदूग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. सर्व रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत आवश्यक उपचार, पुढील मार्गदर्शन आणि मोफत औषध वितरण करण्यात आले.
शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे स्थानिक ग्रामस्थांनी मनःपूर्वक स्वागत केले.
स्नेहाधर्म धर्मार्थ दवाखाना तर्फे अशा उपक्रमांचे प्रमाण आणखी वाढवून आरोग्य सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.






























