आरडा श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात भव्य दर्शन सोहळा; मान्यवरांचा उपस्थितीत अन्नदान कार्यक्रम

471

T NEWS मराठी नेटवर्क
सिरोंचा(प्रतिनिधी) तालुक्यातील आरडा येथील श्री मल्लिका अर्जुन स्वामी मंदिरात आज भक्तिमय वातावरणात भव्य दर्शन सोहळा संपन्न झाला. मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून गेला होता. धार्मिक उत्साह, जयघोष आणि भक्तिरसाने परिसर भारावून गेला.

या पवित्र प्रसंगी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या श्रद्धेने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे सुपुत्र, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी मंदिरात उपस्थित राहून श्री मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेतले व ग्रामीण भागातील सर्वांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास कमलाकर ताटीकोंडावर, तिरुपती मडावी, योगेश तलांडे, आकाश राऊत, ओम कांदो, डॉ. पेद्दी मॅडम, पवन, शेखर तसेच सिरोंचा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाने आरडा परिसरात भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संदेश दिला. मंदिरातील दर्शन, पूजा विधी आणि अन्नदानामुळे वातावरण अधिक पवित्र व मंगलमय झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here