आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचेसमोर मांडल्या तालुक्यातील समस्या -बानय्या जनगाम यांची विकास कामाबाबत चर्चा

316

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या तालुक्यातील विविध समस्या तसेच तालुक्यात सुरु असलेल्या विकास कामाबाबत राकाँचे (अजित पवार) नेते बानय्या जनगाम यांनी सविस्तर चर्चा केली़ या चर्चेदरम्यान तालुक्यातील प्रलंबित समस्या प्राधान्यांना सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जनगाम यांनी केले़
सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली, झिंगानूर, बामणी, रेगुंठा परिसरातील अंतर्गत रस्ते, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास योजना, दलित वस्ती योजना, आदिम जमाती, ठक्कर बाप्पा योजना प्रधानमंत्री आदर्श योजना, एकात्मिक कृती आराखडा या योजनेतून ग्रामीण भागातील गावाचे विकास करण्यासाठी बानय्या जनगाम यांनी आ़ धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन सादर केले़ तसेच तालुक्यातील विकास कामांवर सविस्तर चर्चा घडवून आणली़ याप्रसंगी आ़ धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुक्यातील समस्यांवर प्रकर्षाने मंथन करीत विकास कामाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला़
यापसंगी बानय्या जनगाम यांचेसह ग्रामपंचायत सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे, ग्रापं गरकापेठाचे सूरज गावडे, राकाँ सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, गणेश रच्चावार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here