जनसामान्यांचा सेवक म्हणजे बानय्याभाऊ

93

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

दुस-यांसाठी मदत करण्यांची भावना अलीकडे दुर्मीळ झालीय. सारेच आपल्या विश्वात रमू लागलेत. अशातही अशी काही माणस आहेत. जे समाजातील इतरांचा विचारच करित नाही. तर त्यांना मदतीचा हात देतात. त्यांच्या अडीअडचणींना समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. माणूसकी जोपासत संवेदनांना प्रतिसाद देतात. अडत्यांचा आधार बनतात.सिरोंचा तालुका आदिवासी विध्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते, आमचे गुरूवर्य, मार्गदर्शक, समोर खंबीरपणे उभा राहून दिशा दाखवणारे आदरणीय बानय्याभाऊ जनगाम हे यापैकीच एक..

जनसामान्याची सेवा हे ब्रिद घेत काकाचा सुरू झालेला सामाजिक, राजकीय प्रवास सातत्याने अविरतपणे सुरु आहे.सिरोंचा तालुक्यातील वेंकटापूर या छोट्याश्या गावातून नेतृत्वाची झळाळी आज संपूर्ण जिल्हयात आज वेगळी छाप सोडत आहे. जास्त न बोलता कामाला पुर्णत्वास न्यायच हा त्यांचा स्वभावगूण आहे. समाजातील अनेक वंचित घटकांना शासकीय योजनांसाठी होत असलेला नाहक त्रास, लहान कागंदासाठी होत असलेली कुचंबणा अनं त्यातून गरीब, विधवा, वयोवृध्द नागरिकांना होत असलेल्या वेदना त्यांनी टिपल्या. अनं त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपल्या घराजवळ कार्यालय उघडल.कार्यालय समोरील रिठा झाडाखाली दररोज शेकडो लोकांची गर्दी या झाडाखाली असते. तिथून मोफत त्यांची कामे केली जातात.कागदपत्र काढली जातात. केवळ कागदपत्रच काढली जात नाही तर काम रखडल असेल तर त्याचा फॉलोअप स्वत बानय्याभाऊ घेतात अनं काम पूर्ण करून दाखवितात.

गेल्या 25 वर्ष राजकारणात कोणत्याही पदावर न राहता बानय्याभाऊ आजही सामान्यांत मिसळतात. त्यांच्या व्यथा, वेदना जाणून त्या कशा सोडविता येतील यासाठी प्रयत्न करतात. त्यांचा हाच गुण अनेकांना आपलासा करून जातो. राजकारण करित असतांना त्यांनी कधीच कुणाचा विरोध केला नाही. पण आपली चातुर्यक्षमता वारंवार सिध्द करत तालुक्यात अनेक युवकांनाजिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ग्रापं सदस्य, सरपंच, उपसरपंच,सारख्या पदे आपल्या बालेकिल्यातून बाहेर पडीत त्यांनी जिल्हा परिषद व मतदारसंघात विजयाचा पताका रोवला. त्यांची जयसुधा बानय्या जनगाम यांनाही त्यांनी नेतृत्वाची संधी दिली. नारायणपूर-जानमपल्ली जिल्हा परिषद गणातून जिल्हा परिषद सदस्य म्हूणन निवडून आली. त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच गडचिरोली जिल्हा परिषदेत महिला व बाल कल्याण सभापती बनून विजयाची सुरवात केली असून सिरोंचा तालुक्यातील अनेक विकासकामे केल्याने तालुक्यातील नागरिक त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करित आहेत.

आदिवासी विध्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपकदादा आत्राम यांच्या विकासाच्या दृष्टीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.अहेरी विधानसभा संघात 2009 साली दीपकदादा आत्राम हे आमदार झाले. त्यांच्या विजयात सिरोंचा तालुक्याचे मोठे योगदान होते. अर्थात यामागे बानय्याभाउंच्या नियोजनाचे मोठे योगदान होता. पण काही कारणस्तव आज अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री मा.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटात राजकीय वाटचाल सुरु केली. तसेच बानय्याभाउंनी राजकीय, सामाजिक क्षेत्रासह धार्मीक कार्यातही सातत्याने योगदान दिले आहे.

लेखक –
दुर्गेश लंबाडी
सीव्हिल कंत्राटदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here