अहेरी तालुक्यात व्येंकटापुर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर पक्षप्रवेश

540

T NEWS मराठी नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी )तालुक्यातील मौजा व्येंकटापुर येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. व्येंकटापुर येथील माजी सरपंच मारोती मडावी तसेच व्यंकटश्वमी अय्यागरु यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

या प्रसंगी डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा परिधान करून औपचारिक प्रवेश करण्यात आला. यावेळी डॉ. आत्राम यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करत, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी व जनहिताचे चांगले कार्य पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रभाकर पर्पटलावर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे व्येंकटापुर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अधिक बळकट होणार असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here