एटापल्ली तालुक्यातील मौजा गर्देवाडा येथे स्नेहादेवी संस्थेतर्फे भव्य रोगनिदान शिबिर संपन्न

137

T NEWS मराठी नेटवर्क-
एटापल्ली (प्रतिनिधी )स्नेहाधर्म धर्मार्थ दवाखाना, सिरोंचा यांच्या उपक्रमातून ग्रामीण आरोग्यसेवेला चालना

एटापल्ली तालुक्यातील मौजा गर्देवाडा येथे स्नेहादेवी संस्थेच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिराचे मार्गदर्शन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. तसेच युवा नेते मा. हर्षवर्धनराव धर्मरावबाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्या पुढाकाराने आणि स्नेहाधर्म धर्मार्थ दवाखाना, सिरोंचा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

शिबिरामध्ये विविध आजारांवर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीचा तपशील पुढीलप्रमाणे—

लिपोमा (गाठ) : ०४ रुग्ण

कुष्ठरोग : ०६ रुग्ण

फुगवटा/गाठ : ०१ रुग्ण (२ महिन्यांच्या बाळामध्ये)

फंगल इन्फेक्शन : ३३ रुग्ण

डोळ्यांचे आजार : ९८ रुग्ण

सिकलसेल : १२ रुग्ण

ताप : ३२ रुग्ण

सामान्य आजार : १६ रुग्ण

या शिबिरात एकूण २०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आजारांचे लवकर निदान करून संबंधित रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन देण्यात आले.

या आरोग्य शिबिरामुळे गर्देवाडा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, स्नेहादेवी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here