फुले -शाहू -आंबेडकर वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहत साजरा -राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थिती

656

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा – मिलिंद बहूद्देशीया विकास मंडळ आणि नालंदा चर्टीटेबल ट्रस्ट सिरोंचाच्या वतीने परिवर्तन भवन, शाहूनगर सिरोंचा येथे फुले-शाहू,आंबेडकर वार्षिक महोत्सव दिनांक 24,25 डिसेंबर रोजी मोठया उत्साहात संपन्न झाला.

या फुले -शाहू -आंबेडकर वार्षिक महोत्सवाला *अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या चिरंजीव हर्षवर्धन बाबा आत्राम हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढविले.

यावेळी मिलिंद बहूद्देशीय विकास मंडळ आणि नालंदा चॅर्टीटेबल ट्रस्ट सिरोंचाच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार केली. दरवर्षी होणाऱ्या फुले -शाहू -आंबेडकर वार्षिक महोत्सवसाठी येणाऱ्या समाज बंधवाना राहण्यासाठी त्रास होत असून परिवर्तन भवन येथे समाज मंदिर मंजुरी करण्यात यावी म्हणून विकास बहूद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅर्टीटेबल ट्रस्ट सिरोंचाच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांना निवेदन देण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,सत्यम पिडगू, स्वामी गोदारी, रमेश मानेम, सलार सय्यद,अंगरक्षक होम कंदो, वाहनचालक आकाश राऊतसह सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here