ओडेवार समाज प्रबोधन मेळावा उत्साहात

538

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
महाराष्ट्र ओडेवार समाजातर्फे ओडेवार समाज प्रबोधन मेळावा ३० डिसेंबर रोजी विठ्ठल रुक्माई मंदिरा समोरील प्रांगणात हजारो समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी सामाजिक शैक्षणिक, समस्या निवारणासाठी चर्चा करण्यात आली.
मेळाव्याच्या प्रारंभी येथील एफसीडी मैदानापासून विठ्ठल मंदिरापर्यंत समाज बांधवांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात नाचत-गाजत रॅली काढण्यात आली. समाज प्रबोधन मेळाव्याचे उ‌द्घाटन सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल गग्गूरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे केंद्रप्रमुख सुधाकर टेकूलवार, उपाध्यक्ष वनविभागाचे वरीष्ठ लिपीक अनिल पसपुलवार, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून अॅड. व्यंकटेश पानेमवार उपस्थित होते. अॅड. वेंकटेश पानेमवार यांनी समाजाच्या विकासासाठी संघटन व एकजूट असले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. ओडेवार समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही ते म्हणाले. सुधाकर टेकुलवार यांनी शिक्षण हा समाजसुधारणेचा पाया आहे़ म्हणून शिक्षणाकडे प्रत्येक पाल्याने गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाला नागेश पसूला, कोमली पासूला, श्रीकांत पोकुरवार, मल्लांना चेवला, आशांना पेदाबोईना, मल्लेश मुक्ताबाईना, कीष्टया येरोला, भास्कर गोरा, महेंद्र बोडेंकी, महेंद्र चेवूला, साई येटला, महेश चेवूला, लक्ष्मण पासूला, प्रवीण पसुला, अंजना गंगनबोईना, किष्टस्वामी पसुला, सतीश चेवूला, लक्ष्मण बोल्ले, समय्या पसुला, प्रकाश येरोला, मल्लेश बट्टी, दुर्गेश पानेम, नागेश पसुला, प्रविण बोडेंकी, मल्लांना चेवला, कोमली पसुला, सत्यम गोरा, मंतय्या गोरा, राजू पानेमवार, प्रकाश येरोला, चंटी बद्दी, बोल्ले समय्या, सत्यम गोरा आदींसह ओडेवार समाजातील प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष बहीवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here