राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी मार्ग केला प्रशस्त -स्वखर्चातून कोप्पेला-रमेशगूडम-कोर्ला मार्गावरील बुजविले खड्डे

457

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा(विशेष प्रतिनिधी)
तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रात मोडत असलेल्या कोप्पेला, रमेशगुडम, कोर्ला या गावाकडे जाणा-या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे़.रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे या मार्गे धावणारी एसटीही बंद राज्य परिवहन महामंडळाद्वारे बंद करण्यात आली होती.यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे़.याबाबत अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही उपाययोजना न झाल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेत राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी स्वत: पुढाकार घेत माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात स्वखर्चाने या मार्गावर मुरुम टाकून रस्त्याची दुरुस्ती केली.यामुळे या सदर मार्ग प्रशस्त झाला आहे़.बानय्या जनगाम यांच्या सामाजिक कार्यामुळे कोर्ला, कोप्पेला परिसरातील नागरिक त्यांचे विशेष आभार मानले आहे़.
तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कोर्लामार्गे धावणारी बस रस्त्याच्या दैनावस्थेमुळे मागील अनेक वर्षापासून बंद होती.यामुळे या परिसरातील नागरिकांचा तालुका मुख्यालयीन प्रवास खडतर बनला होता.राकाँ जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचेकडे सिरोंचा-कोर्ला मार्गे झिंगानूर बस सुरु कण्याची मागणी निवेदनातून लावून धरली होती. याची दखल घेत आमदार आत्राम यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अहेरी आगाराला बस सुरु करण्याची निर्देश दिले होते.त्यानुसार अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अहेरी आगारातून सिरोंचा मार्गे कोर्लापर्यंत बस सुरु करण्यात आली.मात्र रस्त्याची खराब अवस्था असल्याचे सांगून एसटी महामंडळाने परत सदर बससेवा बंद केली.यामुळे या परिसरातील नागरिकांचा पुन्हा हिरमोड झाला आहे़.केवळ खराब रस्त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब बानय्या जनगाम यांनी गांभीर्याने घेतली. आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात त्यांनी कोप्पेला-रमेशगूडम-कोर्ला या रस्त्याची स्वखर्चाने ट्रॅक्टर व मजूर लावून वाहून गेलेला रस्ता व खड्डे मुरूम टाकून बुजविले. यामुळे सदर मार्ग आता प्रशस्त बनला असून आवागमन करणे सोपे झाले आहे़ बानय्या जनगाम यांच्या सामाजिक कार्यामुळे कोर्ला, कोप्पेला परिसरातील नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे़.
यावेळी राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, सरपंच लक्ष्मण गावडे,सरपंच सूरज गावडे,सरपंच सुरेश जनगाम,कौशल्या आत्राम, सरपंच सुशीला वेलादी,उपसरपंच शेखर गणपूरपू, माजी सरपंच बोडका गावडे,भारत मडावी,लक्ष्मण गावडे, निलेश सडमेक, श्रीनिवास चेडे, अशोक मडावी, गोपाल सडमेक, नारायण तलंडी, आनंदाराव नीलम, दुर्गेश लंबाडी,बाबुराव कुम्मरी,श्रीनिवास कुम्मरी, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्यालासह कोर्ला परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)गटचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here