


T NEWS मराठी नेटवर्क
सिरोंचा(प्रतिनिधी )आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सिरोंचा येथील क्रीडा संकुल मैदानावर होणाऱ्या भव्य सकल हिंदू संमेलन च्या पार्श्वभूमीवर आज शहरात आयोजित करण्यात आलेली बाईक रॅली मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने हिंदू बांधव आणि भगिनी सहभागी झाल्याने ही रॅली भव्य व ऐतिहासिक ठरली.
बाईक रॅली ही अय्यप्पा मंदिर पासून नेहरू चौक सुभाष चौक विवेकानंद चौक कोत्तागुडम येथून परत शिवाजी चौकात संपन्न झाली,बाईक रॅली दरम्यान ‘जय श्री राम’, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण सिरोंचा धुमधुमाले न्हाऊन निघाले. भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि शिस्तबद्ध सहभागामुळे रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः महिलांचा आणि युवकांचा सहभाग लक्षणीय ठरला असून, यामुळे हिंदू समाजातील एकजूट, आपुलकी आणि संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडले.
ही बाईक रॅली केवळ एक शोभायात्रा नसून, उद्या होणाऱ्या भगव्या हिंदू संमेलनासाठी जनजागृती आणि आवाहनाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. रॅलीच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी उद्या होणाऱ्या हिंदू संमेलनात उपस्थित राहावे, समाजाच्या एकतेचा आणि सनातन संस्कृतीच्या रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचावा, हा प्रमुख उद्देश होता.
रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उद्या होणाऱ्या संमेलनासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व हिंदू बांधवांना व भगिनींना आवाहन करण्यात आले आहे की, उद्या क्रीडा संकुल मैदानावर होणाऱ्या भगव्या हिंदू संमेलन मेळाव्यास कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यक्रमाला यशस्वी करावे.
आजची बाईक रॅली यशस्वीरित्या पार पडल्याने हिंदू समाजाच्या संघटनात्मक ताकदीचे स्पष्ट दर्शन घडले असून, उद्याचा भगवा हिंदू संमेलन मेळावा आणखी भव्य आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.






























