राष्ट्रीय अनु.जाती-जनजाती विकास परिषदेची जिल्हा संघटनात्मक आढावा बैठक संपन्न -सिरोंचा नगर सेवक सतीश भोगे यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती, माजी आमदार देवराव होळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

292

 

T NEWS मराठी नेटवर्क –
सिरोंचा(प्रतिनिधी )राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद,नवी दिल्ली शाखा गडचिरोली अंतर्गत काल दि.२० एप्रिल २०२६ रोजी जिल्हा संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम गडचिरोली येथे पारपडलेल्या या बैठकीत सिरोंचा नगर पंचायतीचे नगर सेवक सतीश भोगे यांची सिरोंचा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय महासचिव तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या बैठकीस राज्य सचिव डॉ.नरेंद्र उंदिरवाडे,ॲड.कवीता मोहरकर यांच्यासह वासुदेवराव पोटवार, अशोक सुकदेवे,कुमार उंदिरवाडे, शुभम रामटेककर,डॉ.नरेंद्र विश्वनाथ उंदीरवाडे प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अनुसूचित जाती विकास परिषद,जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेश्वर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती जन जमाती,अमोल कुडमेते जिल्हा उपाध्यक्ष,मृण्मयी उंदीरवाडे जिल्हा सचिव,शुभम वनकर तालुकाध्यक्ष गडचिरोली,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बानय्या जनगाम,गर्कापेठा ग्राम पंचायतचे सरपंच सुरज गावडे व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.सतीश भोगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे.
सिरोंचा नगर पंचायतीचे नगरसेवक असलेल्या सतीश भोगे यांच्यावर आता तालुका पातळीवरील संघटनात्मक जबाबदारी आल्याने सिरोंचा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here