सन 2022 वर्षीच्या पावसाळ्यातील नुकसानीची भरपाई द्या – अजय कंकडालवार यांचा आंदोलनाचा इशारा

308

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहेरी (प्रतिनिधी )
मागील वर्षी पावसाळ्यात सर्वत्र पुरस्थिती ओढावून मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले. तसेच अनेक घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य खराब वा वाहून गेले. शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात मदत निधी देण्यात आला. मात्र अनेक नुकसानग्रस्तांना अद्यापही भरपाई मिळाली नसल्याने संबंधितांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा नागरिकांना घेऊन तहसिल कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिप अध्यक्ष तथा अहेरी कृउबास सभापती अजय कंकडालवार यांनी तहसिलदारांन निवेदनातून दिला आहे.
2022 मधील पावसाळ्यात पुराने कहर केल्याने तालुक्यातील अनेक भागाला याचा जबर फटका बसता होता. यामध्ये मोद्दूमडगू, आलापल्ली, नागेपल्लीसह इतर गावांचा समावेश आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने संसारपयोगी साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मदत निधी जाहीर करुन महसूल विभागाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेशही दिले होते. याअंतर्गत महसूल विभागाद्वारे पंचनामे करण्यात आले. मात्र यातील अनेक पुरबाधितांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची माहिती नुकसानग्रस्तांनी अजय कंकडालवार यांची भेट घेऊन सांगितली.
तालुक्यातील पुरपीडितांची अडचण लक्षात घेत अजय कंकडालवार यांनी तहसीलदार तथा तालुका दांडाधिकारी यांना भेट घेत. पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिकांना आपल्या विभागाकडून मदत का मिळाली नाही,अशी विचारणा केली. त्यावर तहसीलदार यांनी 50 टक्के लोकांना मदत निधी देण्यात आले असून 50 टक्के लोकांना लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले. मदतीपासून वंचित असल्याने नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, अन्यथा पुरपीडित नुकसानग्रस्तांना घेऊन तहसिल कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्याचा इशारा अजय कंकडालवार यांनी तहसिलदारांना दिला आहे.
यावेळी माजी जिप सदस्य अजय नैताम, माजी सदस्य सुनीता कुसनाके, माजी सभापती सुरेखा आलम, अहेरी नपं नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेकसह, आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here