





सिरोंचा(प्रतिनिधी ) नगर पंचायत सिरोंचा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्थानिक शिवाजी चौक येथे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे शिव जयंती निमित्ताने वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सिरोचा शहरातील आविष्कार शाळा,जिल्हा परिषद महाविद्यालय,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मेधाश्री शाळा,राजे धर्मराव महाविद्यालय, भगवंतराव महाविद्यालय तसेच गावातील इतर नागरिकांनी सहभाग घेतला आहे.शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. सदर स्पर्धेतील वक्तृत्व स्पर्धमध्ये, मोनिका वाढई प्रथम क्रमांक पटकविला व तनिष्क वाढई द्वितीय क्रमांक आलाअसून वेशभूषा स्पर्धेमध्ये , आर्या संदीप परचडाराव प्रथम क्रमांक,व अविष्कार शाळेचे विद्यार्थी कार्तिकेय बत्तूला व सहस्त्रेय बत्तूला ह्यांचा द्वितीय क्रमांक प्राप्त झालं, तसेच नृत्य स्पर्धेमध्ये आविष्कार शाळा चमू व प्रणिता तगरे ह्यांच गुणांकन सारखे असल्यानं दोघानाही प्रथम क्रमांक व जिल्हा परिषद महाविद्यालय चमु द्वितीय क्रमांक पटकविला आहे.
यावेळी नगरध्यक्षा फरजाना इफ्तेखर शेख , तहसीलदार तथा मुख्यधिकारी जितेंद्र शिकतोडे,उपविभागीय पोलिस अधिकारी नाईक, उपध्यक्ष बबलू पाशा ,पोलीस निरीक्षक राठोड, सहाय्य पोलीस निरीक्षक काटकर, नगरपंचायत सभापती पद्मा पिल्ली, भवानी गनपुरपू, नुसरत शेख ,नगरसेवक सतीश भोगे, पद्मा भोगे, इम्तियाज खान, नरेश अलोने ,सतीश रचारलावर, रणजित गागापुरापू, सपना तोकला, महेश्वरी पेद्दपल्ली, मल्लेश्र्वरी दुग्यला, जगदीश रलाबंदिवार, ममता पिलिवार, राजेश बंदेला, बक्कु अकुदरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार,राका सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी,सतीश जवाजी, रवि रलाबंडीवार, मारोती गणपुरपू, समया तोकला ,भगवान पिलीसह
नगरपंचायत सिरोंचाचे सर्वच नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.तसेच सिरोंचा तालुक्यातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रम परीक्षण सभापती, नुसरत शेख, नगरसेवक रंजित गागापुरवार , सतीश रचार्लावार , नगर पंचायत अभियंता धर्मेंद्र घोडे यांनी केली आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन एम डी इरफान यांनी केले आहे.






























