सिरोंचा नगर पंचायतचे आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम सभापतीं ची निवड बिनविरोध

286

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :

सिरोंचा (प्रतिनिधी )

  सतरा सदस्यसंख्या असलेल्या सिरोंचा नगरपंचायतीच्या स्थायी व विषय समित्यांची निवडणूक शांतततेत पार पाडली. यात आरोग्य, पाणी पुरवठा व बांधकामा समित्या सभापतींची निवड बिनविरोध झाली. तर महिला व बालकल्याण सभापतीची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली.
या निवडणूकीत आविसंचे नपं उपाध्यक्ष बबलू पाशा यांची आरोग्य व स्वच्छता सभापती, नगरसेवक इम्तियाज खान यांना पाणी पुरवठा व जलनिस्सारण तसेच ममता पिल्ली यांची बांधकाम सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला. यात मल्लेश्वरी सायलू दुग्याला यांनी बाजी मारली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी व्ही. एस. भाकरे, नगराध्यक्षा फरजाना शेख, तहसिलदार तथा मुख्याधिकारी जितेंद्र शिकतोडे, नपं अभियंता धर्मेंद्र घोडे, नगरसेवक तथा विरोधी गटनेता सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार, रंजीत गागापुरपूवार, भवानी गनपुरपु, नुसरत शेख, पद्मा भोगे, नरेश आलोने, सपना तोकला, जगदीश रालाबंडीवार, राजेश बेद्देला, बक्कु अकुदारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here