


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :

सिरोंचा (प्रतिनिधी ) सिरोंचा तालुक्यातील गरकापेठा येथील नागराजू कुम्मरी शिवरात्री निमित्ताने आपल्या मित्रासह अंघोळीसाठी गेले होते.नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले असत खोल पाण्यात गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.


गरकापेठा येथील आविसं व काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी आविसं सिरोंचा सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांना मृत्यूची माहिती दिले. त्यानुसार जनगाम यांनी गरकापेठा येथील मृतक नागराजू कुम्मरी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबासोबत आस्थेने विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत देऊन कुटुंबाची सांत्वन केले आहे.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम,सुधाकर दुर्गम,दुर्गेश लांबाडी, राजेश पडाली, लक्ष्मण बोल्ले, गणेश रच्चवारसह गरकापेठा गावातील आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते





























