सिरोंचा येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे माजी जिप.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्‍घाटन तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.

399

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :

सिरोंचा – गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सिरोंचा येथे जनसंपर्क कार्यालये उभारण्यात आली आहेत, त्याचे उद्‍घाटन गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते झाले.
या जनसंपर्क कार्यालयाची उदघाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,काँग्रेसनेते बानय्या जनगाम,सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी,महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडे हे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती सुरेखाताई आलम,माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुगणाताई तलांडे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष फाझील पाशा,उपाध्यक्ष सागर मूलकाला,सिरोंचा बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,महिला काँग्रेस अध्यक्ष शेख दीदी,नगरपंचायत माजी नागराध्यक्ष मारिया दीदी,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगली,सरपंच अजय आत्राम,सरपंच सुरज गावडे,सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सिजाता येलम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम हे होते.

जनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे केली जातील. त्यांच्या समस्या-अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उद्‍घाटनप्रसंगी व्यक्त केला. तसेच उपस्थित मान्यवरांनी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजूट काम करून काँग्रेस पक्षाचे नामदेव किरसान यांना विजयी मिळवून देण्यासाठी रणनीती तयार केले आहेत.

या सोहळ्याला सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,श्रीनिवास दुर्गम,माजिद आली,सचिन पंचार्य,राकेश सडमेकसह सिरोंचा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here