अहेरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात कॉर्नर सभा आयोजित -अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थित

616

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहेरी(प्रतिनिधी )गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया, महाविकास आघाडीचे उमदेवार डाॅ.नामदेवराव किरसान यांच्या प्रचारासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या छाल्लेवाडा,गोंड मोल्हा,भिमारगुडमसह परिसरातील गावामध्ये कॉर्नर सभा घेण्यात आली आहे.

दरम्यान कॉर्नर सभेला उपस्थित मतदारांना महत्वाच्या विविध समस्या विचारात घेऊन येत्या १९ तरीखेला होणाऱ्या गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते तथा कांग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या दुसऱ्या क्रमांकवर आसलेल्या पंजा या चिन्ह समोर बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी गावोगावी घरोघरी आपण प्रचार करावे,आणि मतदारांना मतदान करण्याचे आव्हान काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जिप सदस्य सुनीत कूसनाके,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी ,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सचिन पांचार्यासह गावातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here