



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (तालुका प्रतिनिधी )
सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीसह परिसरात रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे शेत पिकांची प्रचंड नासाडी झाली असून अनेक घरांची पडझड झाली असून वादळीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणीकरून प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांनी केली आहे.

सिरोंचा तालुक्यात आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे आंबा,भात,अन्नधान्याची मोठी नासाडी झाली. तसेच पोचमपल्ली गावात अनेकांचे घरे कोसडले असून घरावरील छते (टिन ) उडून घेले आहेत यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू पावसात भिजले. तसेच तालुक्यातील काही गावामध्ये विजांच्या कडकडामुळे टीव्ही, फ्रीज, कूलर, सोलर संच आदी निकामी झाले. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतीचे व कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना यथायोग्य आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांनी यावेळी केली.


























