अत्याचारी आरोपीस 20 वर्षांचा कारावा – 50 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा -जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

438
xr:d:DAFpOkVO2mg:10,j:862836514917420597,t:23072105

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली(प्रतिनिधी )
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 50 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांनी आज, 14 मे रोजी ठोठावली. राहूल दिलीप लटारे (23) रा. गव्हार मोहल्ला ता. चामोर्शी असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, चामोर्शी पोस्टे येथे 3 नोव्हेंबर 2019 रोजी पीडिता (16) हिने फिर्याद दिली की, ती शिक्षण घेण्याकरीता चामोर्शी येथे आपल्या आजोबाकडे वास्तव्यास होती. आरोपी राहूल लटारे हा पीडितेला शाळेत जात असताना तिच्या मागे जायचा. परंतु पीडिता ही त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. त्यानंतर आरोपीने पीडितेला वारंवार मोबाईलवर फोन करून, पीडितेसोबत प्रेम प्रकरण सुरु केले. तिला फिरायला घेऊन जायचा. तसेच तिला घरी बोलावून तिच्याशी शारिरीक संबंध करीत होता. त्यानंतर आरोपने पीडितेशी संबंध तोडून तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून भांडण केले. आरोपीला पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनसुद्धा तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरीक शोषण केले. याबाबतची फिर्याद पीडितेने 3 नोव्हेंबर 2019 चामोर्शी पोस्टेत दिली. यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस 3 नोव्हेंबर 2019 रोजी अटक केली. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर यांनी आज, 14 मे रोजी आरोपी राहूल लटारे यास कलम 376 भादंवि, सहकलम 4, 6 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 मध्ये दोषी ठरवून 20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडतेला देण्याचे आदेश पारित केले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकिल अनिल प्रधान यांनी काम पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास मपोउपनि निशा खोब्रागडे यांनी केला. कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचा-यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here