जिल्ह्याचा निकाल 94.67 टक्के -श्रेया,यश, तेजस्वी जिल्ह्यात अव्वल

478

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –

सिरोंचा (प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी, (27 मे) जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल 94.67 टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. आरमोरी येथील पॅराडाईज इंग्लिश मिडीयम शाळेची विद्यार्थीनी श्रेया अशोक सोरते तसेच आरमोरी येथीलच आंबेडकर विद्यालयाचा विद्यार्थी यश प्रभाकर आंबोरकर यांनी 96.40 टक्के गुण पटकावित जिल्ह्यातून संयुक्तिरत्या प्रथम स्थान पटकाविले आहे.

तेजस्वी तिरुपती इंदूरी यांनी
500 पैकी 479 मार्क घेऊन
95:80 गुण मिळवीली आहे. डिजनीलँड इंग्लिश मीडियम स्कूल सिरोंचा विशेष म्हणजे द्वितीय व तृतीय स्थानीही संयुक्तरित्या प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (92.52) यंदा दहावीचा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. तर नुकताच लागलेल्या बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही मुलींनी आघाडी घेत ‘मुलांपेक्षा आम्हीच भारी’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 14 हजार 305 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 14 हजार 25 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात मुली (6777), मुलांचा (7248) समावेश आहे. यामध्ये एकूण 13278 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात मुली 6545(94.67) तर मुले 6733 (92.89) उत्तीर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात अव्वलसह तिन्ही क्रमांकावर संयुक्तरित्या दोन-दोन विद्यार्थ्यांनी यश पटकाविले आहे. यामध्ये आरमोरी येथील श्रेया सोरते व येथीलच यश आंबोरकर हे दोन विद्यार्थी संयुक्तरित्या अव्वल आले आहेत. तर
गडचिरोली येथील शिवाजी हायस्कुलची पुर्वा काटे व वसंत विद्यालय गडचिरोलीची धनश्री मेश्राम संयुक्तरित्या (96 टक्के) तर द्वितीय स्थानावर सिरोंचा येथील डिजनीलँड इंग्लिश मीडियम स्कुलची तेजस्वी इंदुरी आणि राणी दुर्गावती विद्यालय गडचिरोलीची मानसी रायपूरे व गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा एैश्वर्य देवानंद कचलामी (95.20) टक्के गुण घेत संयुक्तरित्या तृतीय स्थान पटकाविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here