सिरोंचा शहरासाठी पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजूरी -न.पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या प्रयत्नाला यश

141

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा शहरासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी प्राणहिता नदी पात्रातून पिण्याचे पाण्यासाठी 0.87 द. ल. घ. मी. पाणी आरक्षणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे. यामुळे सिरोंचावासीयांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. विशेष म्हणून पाणी पुरवठा योजनेसाठी न. पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपूरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे शहरवासीयांची पाण्याची समस्या कायमची मिटणार आहे.
प्राणहिता नदी पात्रातून पिण्याचे पाणी पुरवठा करण्या करीत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी केलेले प्रयत्नांना यश मिळाले आहे. बबलू पाशा हे सिरोंचा नगरपंचायत युवानेतृत्व व युवा उपाध्यक्ष असून सिरोंचा शहराच्या विकासासाठी व समस्यांवर प्रत्येक वेळी धावपळ करतात आणि या योजनेसाठी गेल्या दोन वर्षपासून सतत प्रयत्न करत होते, आज त्यांचा मेहनतीला यश मिळाले असून शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेचा लाभ सिरोंचा शहर वासियांना होणार असून नागरिक आभार व्यक्त करत आहेत.
या योजनेचा लाभ थेट सिरोंचा वासीयांना मिळणार आणि शुद्ध व आर ओ पाणी नागरिकांना मिळणार आणि असेच शहराच्या विसासकरिता पुढेही प्रयत्न करणार  असे यांनी व्यक्त केले पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नपं उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here