


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
तेलंगणा राज्यातील सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा बतकम्मा, तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा तालुक्यात बातकम्मा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बतुकम्मा उत्सवाची सुरुवात आज दिनांक 2 ऑक्टोबर पासून सिरोंचा तालुक्यासह सिरोंचा शहरात मोठ्या उत्साहत करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सिरोंचा शहरातील विविध वार्डातील महिलांचा विनंतीला मान देत नगर पंचायत सिरोंचाचे नगर अध्यक्ष फरजाना इफ्तेखार शेख यांनी सिरोंचा शहरातील वार्ड क्र 7 सह विविध वार्डातील बातकम्मा मंडळीना भेट देऊन त्यांच्या सोबत बातकम्मा कार्यक्रमात सहभागी झाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाली.
बातकम्मा कार्यक्रममुळे सिरोंचा तालुक्यासह सिरोंचा शहरांत 9 दिवस भक्तिमय वातावरण पाहवयास मिळते.



























