‘धर्मराव’च्या दोन खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड

357

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)स्थानिक धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी नितीन सडमेक व गायत्री सिडाम यांनी नुकताच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय स्तरावर आपली निवड सार्थ ठरविली आह.
नितीन सडमेक हा विज्ञान शाखेतील इयत्ता 12 वीचा विद्यार्थी असून त्याने उंच उडीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. नितीन सडमेक हा सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम असा ओळख असलेल्या किस्टाय्यापल्ली येथील सामान्य कुटुंबात जन्मलेला विध्यार्थी आहे.तर याच विद्यालयाची गायत्री सिडाम हिने धावण्यात अव्वल स्थान पटकावित शाळेचा नावलौकिक केला.
या दोन्ही खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे दोघांचीही विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरावरुन अभिनंदन केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here