सिरोंचात बतकम्मा मुर्तीचे थाटात लोकार्पण -सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचा पुढाकार

415

तिरुपती चिट्याला 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (तालुका प्रतिनिधी)
सिरोंचा नगरपंचायत (Nagar Panchyat)पुढाकारातून नदीघाट (River road)परिसरातील स्थानिक विठ्ठलश्वर मंदिर परिसरात बतकम्मा मूर्तीचा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला.
बातकम्मा मूर्ती लोकार्पण कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक (dfo)पूनम पाटे होत्या. विशेष अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस(sdpo) अधिकारी संदेश नाईक, तहसीलदार होनमारे तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार हमीद सय्यद, पोलीस उपनिरीक्षक(api) रवींद्र म्हैसकर, नगराध्यक्षा  (president )फर्जना शेख, न.पं. उपाध्यक्ष(voice president )बबलू पाशा, न.पं. सभापती व नगरसेवक आणि सिरोंचा शहरातील प्रतिष्टीत नागरिक मंचावर उपस्थित होते.

सिरोंचा शहर तेलंगणा राज्याचा सीमेवर असल्यामुळे तेलंगणा आणि सिरोंचा शहराचा रोटी-बेटी व्यवहार असून तेलंगणा राज्यातील अनेक सण सिरोंचा तालुक्यात साजरा करतात. भाविकांची मागणी लक्षात घेता सिरोंचा शहरात बातकम्मा मूर्तीची स्थापना न.पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या भव्य दिव्या बातकम्मा मूर्तिचे लोकार्पण करण्यात आली. यावेळी बातकम्मा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील अनेक वार्डातील महिलांनी सहभाग घेऊन मोठ-मोठे बातकम्मा देवी तयार केली होती. यामध्ये प्रथम क्रमांक वार्ड क्र. 7 ने पटकाविले. न. पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांचेकडून विजेत्यांना 10 हजार रोख रक्कम बक्षिस देण्यात आले. द्वितीय क्रमांक वार्ड क्र. 17 यांना 5 हजार रोख रक्कम नगरसेवक जगदीश रालाबंडीवार यांचेकडून देण्यात आले. तृतीय क्रमांक पटकविलेल्या वार्ड क्र. 13 ला 3 हजार रोख रक्कम नगरसेवक सतीश राचर्लावार यांचेकडून देण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षीस भाग्यश्रीताई आत्राम कडून देण्यात आले. बातकम्मा लोकार्पण सोहळ्यासाठी शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here