


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अमरावती(विशेष प्रतिनिधी) शहरातील फ्रेजरपुरा पाेलीस ठाण्यात कार्यरत असणाèया महिला पाेलीस कर्मचाèयाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी (ता.१) सायंकाळी सात वाजताचे सुमारास उघडकीस आली. आशा राहुल धुळे (तायडे) (३८, गुरुकृपा काॅलनी, वडाळी, अमरावती) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
आशा धुळे (तायडे) या फ्रेजरपुरा पाेलीस ठाण्यात कार्यरत हाेत्या. त्यांचे पती राहुल धुळे राज्य राखीव पाेलीस दल (क्र.९) मध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहेत. गेल्या १३ तारखेपासून आशा धुळे (तायडे) या रजेवर हाेत्या. त्यांना चाैदा वर्षाचा एक मुलगा तर सात वर्षाची एक मुलगी आहे. आज सायंकाळी सहा वाजताचे सुमारास त्या घरात एकट्या हाेत्या. पती, मुलगी व मुलगा बाहेर हाेते. मुलगा सायंकाळी सहा वाजता घरात जात असतांना त्यांच्या घरातून दाेन व्यक्ती बाहेर येत असल्याचे त्याला दिसून आल्या. यानंतर त्याने घरात प्रवेश केला असता त्याची आई बिछान्यावर बेशुद्ध अवस्थेत पडली हाेती. त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न केला परंतु आईने प्रतिसाद दिला नाही.
यामुळे घाबरलेल्या मुलाने तात्काळ वडीलांना माहीती दिली. शेजाèयांना देखील घटनेची माहीती देण्यात आली. काही मिनीटातच महिला पाेलीस कर्मचाèयाच्या घरी माेठी गर्दी झाली. पाेलीसांना माहीती मिळताच फ्रेजरपुरा ठाणेदार राेशन शिरसाट घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला. महिलेच्या गळ्यावर व्रण असल्याचे पाेलीस सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेमुळे गुरुकृपा काॅलनीसह शहरात माेठी खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ अधिकारी पाेहाेचले –
पाेलीस कर्मचारी महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस येताच पाेलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. महिला पाेलीस कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे तिच्या कुटूंबियांच्या आक्राेश परिसरात ऐकू येत हाेता. घटनेमुळे परिसरात शाेककळा पसरली आहे.






























