नपं सिरोंचा येथील दोन नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटात प्रवेश

286

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) येथील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्षांसह आदिवासी विद्यार्थी संघाच्या एका मोठ्या गटाने महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केल्याने सिरोंचा राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. दरम्यान 30 जुलैला राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) दोन नगरसेवकांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवेश केला. सपना समय्या तोकला व महेश्वरी संजय पेदापेल्ली अशी नगरसेवकांची नावे आहेत. या पक्ष प्रवेशादरम्यान उपनगराध्यक्ष बबलू पाशा, जगदीश रालाबंडीवार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here