



तुम्ही कृतज्ञ असाल, चांगली कामं करत असाल तर तुमच्या वाटेतले नशिबाचे दगडधोंडे पण नियती दूर करते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहरुख़!
****************
त्याच्या मुलावर ड्रग्ज बाळगल्याचे आरोप झाले इथपासून ते तो मुलगा निर्दोष आहे हे कोर्टात सिद्ध झालं इथपर्यंतच्या काळात, शाहरुखचं वागणं अतिशय decent होतं. तो कुठल्याही मंत्र्या-संत्र्याला भेटायला गेला नाही. कारण त्याचा त्याच्या मुलावर आणि देशाच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता! स्वातंत्र्यसैनिकाचा नातू आहे तो!! आणि.. सगळ्यात महत्त्वाचं.. आपला आब राखून वागणं हा शाहरुख़चा USP आहे.

आता देते त्याच्या समाजकार्याची यादी.. ज्याचा गवगवा त्याने स्वत: कधीच केला नाही.
-ऍसिड अटॅक झालेल्या महिलांच्या प्लास्टिक सर्जरीपर्यंतच्या सगळ्या उपचारांचा खर्च शाहरुख़ची मीर फौंडेशन ही संस्था करते.
-मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमधे कॅन्सर झालेल्या लहान मुलांसाठी एक वॉर्ड आहे. त्या वॉर्डमधे भरती होणाऱ्या सगळ्या कॅन्सरग्रस्त मुलांच्या खर्चासाठी शाहरुख़कडून भली मोठी रक्कम जात असते.
-२०१२ साली त्याने देशभरातली बारा खेडी दत्तक घेतली आणि तिथे स्वखर्चाने वीज, पाणी, शाळा आणि आरोग्य सुविधा उभ्या केल्या.
-२००८ मधे बिहारच्या पूरग्रस्तांसाठी जगभर लाईव शोज करून ३० दशलक्ष रुपये गोळा करून त्यांना दिले.
-२०१५ मधे चेन्नई पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपये, २०१३ मधे उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी ३३ लाख रुपये आणि त्सुनामी रिलीफ फंडमधे २५ लाख रुपये त्याने त्याच्या खिशातून दिले.
-त्याची मुलाखत घेऊन परत जात असतांना एका पत्रकाराचा अपघात झाला. त्याच्या उपचारांचा सगळा खर्च शाहरुख़ने केला, जो दिवसाला दोन लाख एवढा होता.
-२००९ मधे ओडिशामधल्या सात खेड्यांमध्ये शाहरुख़ने स्वखर्चाने सोलर इलेक्ट्रीसिटी प्रोजेक्ट सुरु केले. ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल ६१ वर्षांनी त्या गावांमध्ये वीज आली.
-IPL सिझन सातमधे त्याच्या टीमला विजेता म्हणून मिळालेली १५ कोटी रक्कम त्याने मुंबई आणि कोलकात्यातील कॅन्सर रुग्णांसाठी दान केली.
-महाराष्ट्रातल्या आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी त्याने जगभर स्वत:चे शोज करून पैसा गोळा केला. इंडियन आर्मीला सात कोटी रुपये दिले.
-करोना काळात आपलं चार मजली घर शाहरुख़ने मुंबई महानगरपालिकेला विनामूल्य वापरायला दिलं होतं. त्याच काळात एक हजार गरीब कुटुंबांना धान्य, तेल वगैरे वस्तू पुरवल्या.
ही फक्त एक छोटी, आठवली तशी यादी आहे. शाहरुख़ने केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमधे झालेल्या २०व्या UNESCO मधे सन्मानित केलं गेलं. इंग्लंडमधल्या LAW UNIVERSITY ने शाहरुख़ला ‘human rights and access to justice and crime’ या विषयातली डॉक्टरेट दिली आहे.
यातलं काय-काय तुम्हाला माहित होतं??
यातल्या एकही गोष्टीचा शाहरुख़ कधीच गवगवा तर सोडा, साधा उल्लेख देखील करत नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘डर’ ‘बाज़ीगर’ ‘अंजाम’सारखे निगेटिव्ह रोल्स त्याने केले. पण त्यानंतरही त्याची romantic हिरोची इमेज बरक़रार राहिली. ‘जोश’मधे ऐश्वर्याच्या भावाचा रोल केला. पण ‘देवदास’मधे तिचा हिरो म्हणून शोभला. या कशाचाही त्याच्या कारकिर्दीवर विपरीत परिणाम झाला नाही. याचं कारण…
तो करत असलेली चांगली कार्यं डेस्टिनी count करतेय! तुम्ही कृतज्ञ असाल, चांगली कामं करत असाल तर तुमच्या वाटेतले नशिबाचे दगडधोंडे पण नियती दूर करते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहरुख़!
हिंदी, उर्दू आणि इंग्लिश भाषांवर त्याचे उत्तम प्रभुत्व आहे. बुद्धिमान माणसातच असू शकते अशी अगदी महीन विनोदबुद्धी त्याच्याकडे आहे. त्याची एनर्जी अफाट आहे. त्याचा अभिनय, त्याच्या गाण्यात दिसणारी त्याची एनर्जी, त्याची कारकीर्द, आणि त्याने कमावलेला आणि तो charity करत असलेला पैसा यात त्याच्या पासंगाला पुरणारा एकही अभिनेता भारतात आज नाही!
अशा या किंग खानला-
अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मुबारक हो!
💐🎊❤️🇮🇳🎉
-मिथिला सुभाष





























