


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-

सिरोंचा (प्रतिनिधी) कोपेला सोमनपल्ली जंगलातून साग वृक्षांची तोड करून अवैधरित्या तेलंगाना राज्यात सगवान वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वरून आसरअल्ली परिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी रात्री सापळा रचुन पहाटे 4.00 वा.आसस्अल्ली- पातागुडम रोडवर तेलंगाना नंबर प्लेट असलेले एक अज्ञात वाहन येत असल्याचे दिसले.
त्या वाहनास अडविले असता फरार होण्याच्या हेतूने वाहन चालक वेग वाढविला परंतू वनकर्मचा-यांच्या सतर्कतेने वाहन अडविण्यात आले व तपासणी केली असता त्यात 8 साग लाकडे भरून असल्याचे आढळले. वाहन क्रमांक AP-24/AB-9556 हे आहे. वाहन चालकाची चौकशी केली असता साग लट्टे भरून तेलंगाना राज्यात विक्री करण्यास नेत असल्याचे कबूल केले. त्यामुळे अवैधरित्या साग तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाल्याने मोक्यावर पंचनामा करून वाहन क्र. AP-24/AB-9556 किंमत रू. 4.00 लाख तसेच साग लट्ठे किंमत 1.03 लाख जप्त करण्यात आले. भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 26 (1) ई,फ 41,42 व 52 अन्वये वनगुन्हा क्र. 03/2025 दिनांक 06.08.2025 नुसार POR जारी केला. व आरोपी नामे राजकुमार अर्जन्ना सुदुला, रा. सोमनपल्ली यास अटक करण्यात आली.
तसेच दिनांक 06.08.2025 रोजी अवैधरित्या साग वृक्षांची कत्तल करून अंकिसा नियतक्षेत्रातील कक्ष क्र. 274 मध्ये साग लठ्ठे तयार करण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुषंगाने वनकर्मचा-यांनी प्रत्यक्ष मोक्यावर जावून धाड टाकली असता 8 साग लठ्ठे साठवून ठेवल्याचे आढळले. लगेच परिसरात शोध मोहीम राबविली असता दोन संशयित आरोपी मिळाले. तेव्हा त्यांना चौकशी करिता ताब्यात घेतले व मोक्यावर साग लठ्ठयांचा पंचनामा करून रू. 1.24 लाख किमंतीचे माल जप्त करण्यात आला व ट्रॅक्टरने वनोपज वनपरिक्षेत्र कार्यालयात वाहतूक करण्यात आली. व भारतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 26 (1) ई,फ 41,42 च 52 अन्वये POR क्र. 02/2025 दिनांक 06.08.2025 नुसार वनगुन्हा दाखल केला. चौकशी दरम्यान संशयित आरोपी 1. प्रसाद रामचंद्र तोरेम, 2. राममुर्ती शंकर मोर्ला रा. गोल्लागुडम (चेक) हे साग लठ्ठे वाहतूक करून तेलंगाना राज्यात विक्री करिता नेणार असल्याचे कबुल करताच त्यांना अटक करण्यात आली.

सदर दोन्ही प्रकरणात एकाच दिवशी कार्यवाही करून रू. 2.27 लाखाचे सागवान आणि एक बोलेरो वाहन क्र. AP-24/AB-9556 किंमत अंदाजे रू. 4.00 लाख जप्त करून आरोपी विरूध्द न्यायालयीन कार्यवाही करण्यात येत आहे.
सदर कार्यवाही उपवनसंर क्षक एस. नवकिशोर रेड्डी( IFS) सिरोंचा वनविभाग, सिरोंचा,अक्षय मिना( IFS) उपविभागीय वन अधिकारी, सिरोंचा यांचे मार्गदर्शनाखाली आर. डी. तोकला, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) आसरअल्ली यांचे नेतृत्वात व्ही. आर. गोल्लेवार, क्षेत्र सहाय्यक, आसरअल्ली, बी. के. पाडदे, वनरक्षक, ए. जी. दोनाडकर, वनरक्षक, आर. व्ही. साळवे, वनरक्षक, डी. पी. गोटा, वनरक्षक आदींनी परिश्रम घेऊन पार पाडली.





























