BIG BREKING – पोलीस-नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार -कोपर्शी जंगलतील घटना

1301

 

T NEWS मराठी नेटवर्क-
गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.
सदर भागात सुरू असणाऱ्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण 04 जहाल माओवाद्यांचे मृतदेह (01 पुरुष आणि 03 महिला) मिळून आले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 01 .303 रायफल जप्त करण्यात आले आहेत.
सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे. सविस्तर माहिती वृत्तपत्राद्वारे कळविण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here