सिरोंचा येथे 25 ला भव्य बतकम्मा महोत्सव -बतकम्मा प्रतियोगितेअंतर्गत बक्षीसांचा वर्षाव

278

T NEWS मराठी नेटवर्क-

नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील विठ्ठलेश्वर मंदिर प्रांगणात २५ सप्टेंबर रोजी भव्य बतकम्मा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या महोत्सवादरम्यान बतक्कमा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ यातील विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात येणार आहे़

नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील विठ्ठलेश्वर मंदिर प्रांगणात भव्य बतकम्मा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ यादरम्यन बतकम्मा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या तीन संघाना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे़ प्रथम पुरस्कार 30001, द्वितीय २०००१ तर तृतीय पुरस्कार 10001 रुपयांचे आहे़ यासोबत विविध प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़ बक्षीस समारंभीय कार्यक्रमात माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून देण्यात येणाऱ्या बक्षीस तनुश्रीताई आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे़
या महोत्सवात बहूसंख्य भाविकांनी उपस्थित राहून देवीचे आशिर्वाद घेण्यासह बहूसंख्य संघानी बतकम्मा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष बबलू पाशा व नपं प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here